लातूर जिल्हा प्रतिनिधी
उत्तम माने
मो.नः 8484828818
लातूर : - लातूर जिल्ह्यामध्ये बंद असलेल्या गुटखा व मटका क्लब अवैध दारू तसेच अवैध वाहतूक मोठ्या प्रमाणात चालू आहे. या अवेध व्यवसायातुन कोट्यावधी रुपयांची उलाढाल होत आहे. या अवैध धंद्यामुळे जनतेमध्ये व तरुण वर्गात गुन्हे मारीचे प्रमाण वाढत आहे.
गावा गावामध्ये अवैध दारू, मटका, गुटखा जोरात सुरू असल्याने तरूण वर्ग बर्बाद होऊन देशोधडीला लागत आहेत.
लातूर जिल्ह्यात उदगीर, निलंगा प्रत्येक तालुक्यात गल्ली बोळात रस्त्यावर खुलेआम दारू, मटका, क्लब , जुगार मोठ्या प्रमाणात चालवला जात आहे. सर्व धंदे
गुंडप्रवृत्तीचे लोकांकडून चालवला जात आहे. त्यामळे गुन्हेगारीचे प्रमाण वाढून सुरक्षा व्यवस्था धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. मटका , जुगार चालवणारे लवकर श्रीमंत व्हावे या आशेपोटी कोट्यावधीश झाले आहेत. कर्नाटकमधून गुटख्याची व दारूची मोठ्याप्रमाणत रात्रदिवस पुरवठा केला जात आहे. कासारशिरसी भागामध्ये जुगाराचे क्लब रात्र दिवस चालवले जात असल्याचे नागरिकामध्ये चर्चा होत आहे.
मटका बंद करा अन्यथा आंदोलनाचा इशारा ...
निलंगा शहरातील व ग्रामीण भागातील मटका व जुगार बंद करण्याची मागणी क्रांतीवीर लहूजी शक्ती सेना यांच्या वतीने पोलीस अधिक्षक यांच्याकडे करण्याची मागणी लहूजी सेनेचे मराठवाडा कार्याध्यक्ष गोविंद सूर्यवंशी यांनी केली आहे. निलंगा शहरातील व ग्रामीण भागातील गोरगरीब मजूर शेतकरी सावकारी विद्यार्थी मोठ्या प्रमाणात असून मटका व जुगार मध्ये हे लोक होरपळून जात असून गोरगरिबाचे संसार उद्धवस्त होत आहेत. गल्ली बोळामध्ये मटक्याचे आकडे घेतले जाते याकडे पोलीस प्रशासन कोठलेही कार्यवाही करीत नाहीत या वर योग्य कार्यवाही न झाल्यास संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा गोविंद सूर्यवंशी यांनी दिली आहे.