पेरमिली येथे बुद्ध मुर्तीचे अनावरण संपन्न

 


मुनिश्वर बोरकर गडचिरोली 

गडचिरोली/पेरमिली - तक्षशिला बुद्ध विहार पेरमिली येथील बुद्ध विहार सिनेकलाकार गगण मलीक मुंबई यांच्या दानातून दिलेल्याअष्टधातुच्या बुद्ध मुर्तीच अनावरण भन्ते सुमनवण्णो भन्ते गण विनय बोधी (डोंगरे ) नितिन गजभिये नागपूर यांच्या प्रमुख उपस्थितीत विधीवत पार पडले.

 सर्वप्रथम त्रिशरण व पंचशिला उपस्थित उपाषक व उपाषिकानी ग्रहण केल्यात त्यानंतर जि . प . प्राथमिक शाळा ' पेरमिली च्या पटांगणात मार्गदर्शनाचा कार्यक्रम संपन्न झाला . कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नितिन गजभिये गगण मालिक फांऊडेशन नागपूर हे होते.

   तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून भदंत सुमनवन्नो महाथेरो चंद्रपूर सा कार्य सदानंद वाघ ,सा . कार्य . पि..एम . खोब्रागडे,सा . कार्य . कु . स्मिता वाळके नागपूर ' पो उप. निरिक्षक सपकाळे अमरावती,अँड. पंकज दहागावकर ,संमय्या करपेत , बहुभाऊ जुनघरे ,प्रा वि एस . सोनोने ' प्रा . घोडेस्वार प्रा.मुनिश्चर बोरकर मनिराम दुगा .प्रमोद आत्राम, सरपंच किरणताई कोरेते , ढोके मँडम ' शुशिला भगत ' आदी लाभले होते . याप्रसंगी भन्ते सुमनवन्नो म्हणाले की ' बुद्धाचे तत्वज्ञान महान आहे. सर्वाना बुद्ध धम्म आचरणात आणावा व त्यांचा प्रचार आणि प्रसार करावा.

    बुद्ध विहारात दररोज त्रिशरण व पंचाशिला ग्रहण कराव्यात यातच आपले सर्वाचे हित आहे.

 गगण मलीक फांउडेशन चे नितिन गजभिये महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातील बुद्ध विहारात बुद्ध मुर्ती दान देत आहेत . याचा लाभ घेवून बुध्दाने सांगीतलेल्या धमाच्या मार्गाने जावे.

 याप्रसंगी कु. स्मिता वाळके ' अँड. पंकज दहागावकर , बहुभाऊ जुनधरे ' समय्या करपेत आदीनी बुद्ध धम्मा विषयी मार्गदर्शन केले . कार्यक्रमाचे संचालन प्रा.सुरेंद्र तावाडे प्रास्ताविक शैलेश राऊत यांनी केले.

 तक्षशिला बुद्ध विहाराच्या सर्व पदाधिकार्‍यानी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमास पेरमिली परिसरातील बहुसंख्य नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते..

Post a Comment

Previous Post Next Post