गावाकडची बातमीचा दणका | पशुवैद्यकीय डॉक्टरच्या नोंदणीवर प्रश्नचिन्ह; चौकशीसाठी प्रकरण अमरावती विभागाकडे

 

Amravati Maharashtra


गावाकडची बातमीचा दणका |

पशुवैद्यकीय डॉक्टरच्या नोंदणीवर प्रश्नचिन्ह; चौकशीसाठी प्रकरण अमरावती विभागाकडे!



विभागीय संपादक/ निलेश रामगावकर 

सुपलवाडा, ता. चांदूर रेल्वे : सुपलवाडा येथील नरेंद्र राजेंद्र ठाकरे यांच्या तक्रारीनंतर चंद्रकांत देशमुख यांच्या पशुवैद्यकीय नोंदणी व जनावरांवर उपचार करण्याच्या कायदेशीर अधिकाराचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. महाराष्ट्र राज्य पशुवैद्यक परिषदेने हे प्रकरण चौकशीसाठी प्रादेशिक सहआयुक्त, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय, अमरावती विभाग यांच्याकडे वर्ग केले आहे.


परिषदेच्या अधिकृत पत्रानुसार, चंद्रकांत देशमुख हे पदविकाधारक असून, त्यांची भारतीय पशुवैद्यक परिषद अधिनियम, १९८४ अन्वये महाराष्ट्र राज्य पशुवैद्यक परिषदेकडे नोंदणी नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार जनावरांवर उपचार करण्याच्या कायदेशीर अधिकाराची स्वतंत्र पडताळणी होणार आहे.


या प्रकरणात संबंधित व्यक्तीची पात्रता, नोंदणी आणि उपचार करण्याचा अधिकार याबाबत चौकशी करून नियमानुसार कार्यवाही करण्यासाठी तक्रार पुढील कार्यवाहीसाठी वर्ग करण्यात आली आहे.


नोंदणी नसताना पशुवैद्यकीय उपचार करण्याचा अधिकार होता का? हा महत्त्वाचा प्रश्न आता उपस्थित झाला असून, चौकशीतून नेमकी वस्तुस्थिती समोर येण्याची अपेक्षा आहे.


‘गावाकडची बातमी’चा दणका! पशुपालकांच्या आरोग्याशी आणि जनावरांच्या सुरक्षिततेशी संबंधित या प्रकरणात संबंधित विभागाने निष्पक्ष चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post