गांधी जयंतीदिनी शेतकऱ्याची गांधीगिरी; न्यायासाठी टॉवरवर चढले

 





विभागीय संपादक निलेश रामगावकर‌ 


तिवसा, वऱ्हा : गांधी जयंतीच्या दिवशी न्यायाच्या मागणीसाठी एका शेतकऱ्याने अनोख्या पद्धतीने आंदोलन करत टॉवरवर चढून गांधीगिरी केली. डाखोरे कुटुंबीयांच्या १६ एकर जमिनीबाबत वाद निर्माण झाला असून, संबंधित जमीन हडप केल्याचा आरोप आंदोलनकर्त्या शेतकऱ्याने केला आहे.

या प्रकरणातील कथित बनावट फेरफार रद्द करून डाखोरे कुटुंबीयांना न्याय द्यावा, अशी मागणी शेतकऱ्याने केली. प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी करून संबंधित कागदपत्रांची पडताळणी करावी आणि दोषींवर कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली.

न्याय मिळेपर्यंत टॉवरवरून खाली उतरणार नसल्याचा निर्धार शेतकऱ्याने व्यक्त केल्याने परिसरात काही काळ खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच संबंधित प्रशासन व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीवर लक्ष ठेवले.


Post a Comment

Previous Post Next Post