भानसरा येथे जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबिर

 




तालुका प्रतिनिधी – विनोद आडे


आर्णी : जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून आयुष्यमान आरोग्य मंदिर, भानसरा, ता. आर्णी येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला परिसरातील ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.


शिबिरात डॉ. गीता देहलेकर, आशा स्वयंसेविका, परिचारिका सौ. संगीता संतोष कुरसंगे तसेच सौ. बडकुले बाई यांच्या उपस्थितीत ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. डॉ. गीता देहलेकर यांनी नागरिकांची सखोल तपासणी करून त्यांच्या आजारानुसार मोफत औषधोपचार व औषधांचे वाटप केले.


यावेळी वाढत्या वयात आरोग्याची काळजी कशी घ्यावी, नियमित व्यायामाचे महत्त्व तसेच दैनंदिन जीवनातील आरोग्यदायी सवयी याबाबत ज्येष्ठ नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले. डॉ. देहलेकर यांनी ज्येष्ठ नागरिकांनी करावयाच्या विविध व्यायामांचे प्रात्यक्षिक करून दाखविले.

शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी आयुष्यमान आरोग्य मंदिरातील कर्मचारी, आशा स्वयंसेविका आणि स्थानिक नागरिकांनी सहकार्य केले.

Post a Comment

Previous Post Next Post