नांदगव्हाण घाटात रायपूर-सोलापूर एसी स्लीपर कोच बसचा अपघात; ३३ प्रवासी प्रवासात, दोघे जखमी
प्रतिनिधी श्रीकांत राऊत महागांव यवतमाळ
महागांव राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ वरील नांदगव्हाण घाटात आज पहाटे ३ ते ४ वाजण्याच्या सुमारास एसी स्लीपर कोच बसचा अपघात झाल्याची घटना घडली. रायपूर येथून सोलापूरकडे जाणाऱ्या CG07GZ6633 क्रमांकाच्या खासगी प्रवासी बसला घाटात अपघात झाला. या बसमध्ये तब्बल ३३ प्रवासी प्रवास करीत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
या अपघातात दोन प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. पहाटेच्या सुमारास घडलेल्या या घटनेने महामार्गावरील प्रवाशांमध्ये खळबळ उडाली. अपघाताची माहिती मिळताच पुढील मदतकार्य आणि अपघाताच्या कारणांचा तपास याबाबत अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे.
Tags
अपघात
