Accident| मदनापूरच्या युवकांचा दत्तरामपूरजवळ अपघात

 

Yavatmal,arni


मदनापूरच्या युवकांचा दत्तरामपूरजवळ अपघात; दुर्गादेवी पाहण्यासाठी यवतमाळकडे जाताना दोघे गंभीर…

महाराष्ट्र


विशेष प्रतिनिधी| सुनिल धुर्वे ,सह विनोद आडे 


आर्णी : दुर्गादेवी पाहण्यासाठी यवतमाळकडे जात असलेल्या मदनापूर येथील युवकांच्या लाल रंगाच्या एर्टिगा कारचा दत्तरामपूर (ता. आर्णी) जवळ अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. MH- 42-AH-1164 क्रमांकाच्या या वाहनाच्या मागील बाजूस ‘माहूरगड’ असे नाव लिहिलेले असल्याचे समजते.

प्राथमिक माहितीनुसार, कारमध्ये तीन ते चार जण प्रवास करत होते. अपघातानंतर जखमींना उपचारासाठी आर्णी येथे आणण्यात आले. त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी यवतमाळकडे रवाना करण्यात आले आहे.

अपघाताचे नेमके कारण तसेच जखमींची नावे अद्याप स्पष्ट झालेली नाहीत. अधिकृत माहिती मिळाल्यानंतर घटनेचा सविस्तर तपशील समोर येणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post