माहूर: बहुजन समाजाने एकत्र येऊन श्रध्देय बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे आणि महाराष्ट्राच्या सत्तेत वाटा मिळवावा, या मुख्य उद्देशाने वंचित बहुजन आघाडीच्या वतीने माहूर तालुक्यातील विविध गावांमध्ये आणि तांड्यांवर जाहीर संपर्क तसेच सखोल मार्गदर्शन मोहीम नुकतीच राबवण्यात आली. या मोहिमेला परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.या विशेष अभियानांतर्गत तालुक्यातील वानोळा तांडा, पानोळा तांडा आणि लांजी तांडा येथे प्रत्यक्ष गाव भेटी देऊन नागरिकांशी थेट संवाद साधण्यात आला. 'गाव तिथे वंचित बहुजन आघाडीची शाखा झालीच पाहिजे' हा ठाम संकल्प करत समाजातील वंचित आणि बहुजन घटकांनी एकत्र येण्याचे आवाहन या वेळी करण्यात आले.प्रमुख वक्त्यांचे मार्गदर्शन:कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक प्राध्यापक मधुसिंग जाधव (माहूर) आणि वंचित बहुजन आघाडीचे किनवट तालुका माजी महासचिव दुधराम भोजु राठोड यांनी उपस्थित जनसमुदायाला अभ्यासपूर्ण व सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी वंचित बहुजनांना राजकीय आणि सामाजिक सत्तेत येण्याचे महत्त्व पटवून दिले. तसेच दुधराम भोजु राठोड यांनी संघटनेची मजबूत बांधणी आणि गाव पातळीवरील कार्यकर्त्यांची भूमिका यावर सविस्तर प्रकाश टाकला.युवा व ज्येष्ठ कार्यकर्त्यांची उपस्थिती:युवकांची फळी अधिक मजबूत करण्यासाठी आणि नव्या ऊर्जेने काम करण्यासाठी साकुर येथील युवा कार्यकर्ते धम्मपाल कांबळे यांनी विशेष पुढाकार घेतला. तर लांजी येथील ज्येष्ठ कार्यकर्ते भिमराव कराळे यांच्या मार्गदर्शनाखाली ज्येष्ठ आणि अनुभवी कार्यकर्त्यांचा मेळ या संपूर्ण मोहिमेत दिसून आला. या अभियानामुळे माहूर तालुक्यातील ग्रामीण भागात वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह संचारला आहे.

