हिम्मत फाउंडेशन व गोविंद चॅरिटेबल ट्रस्टतर्फे तळेगाव दशासर येथे उद्या मोफत महा-आरोग्य शिबिर

 

Amaravati


विभागीय संपादक : निलेश रामगावकर


धामणगाव रेल्वे/तळेगाव दशासर : सामाजिक बांधिलकी जपत सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हिम्मत फाउंडेशन व गोविंद चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने तळेगाव दशासर येथे गुरुवार, दि. २७ ऑगस्ट २०२६ रोजी मोफत महा-आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर तुषार धनजोडे व मित्र परिवाराच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आले आहे.


शिबिर वार्ड क्र. ४, संत जगनाडे महाराज चौक, तेलीपुरा, तळेगाव दशासर येथे सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत होणार आहे. या शिबिरात विविध आजारांची तपासणी करून तज्ज्ञ डॉक्टरांकडून नागरिकांना आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात येणार आहे.


शिबिरासाठी शालिनीताई मेघे हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, नागपूर तसेच पंजाबराव देशमुख मेडिकल कॉलेज (PDMC), अमरावती येथील तज्ज्ञ डॉक्टर उपस्थित राहणार आहेत. प्राथमिक आरोग्य तपासणी, आवश्यक निदान व उपचाराबाबत मार्गदर्शन तसेच गरजेनुसार मोफत औषधांचे वाटप करण्यात येणार आहे.


तपासणीनंतर ज्या रुग्णांना पुढील मोठ्या उपचारांची आवश्यकता असेल, अशा रुग्णांना नागपूर व अमरावती येथील संबंधित रुग्णालयांमध्ये पुढील उपचारासाठी पाठविण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.


ग्रामीण व सर्वसामान्य नागरिकांना वेळेवर आरोग्य तपासणी आणि तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला मिळावा तसेच आर्थिक अडचणींमुळे कोणीही उपचारापासून वंचित राहू नये, हा या महा-आरोग्य शिबिरामागील प्रमुख उद्देश आहे.


तळेगाव दशासर व परिसरातील नागरिकांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेऊन मोठ्या संख्येने उपस्थित राहावे आणि आपली आरोग्य तपासणी करून घ्यावी, असे आवाहन हिम्मत फाउंडेशन व गोविंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.


शिबिराचे ठिकाण : वार्ड क्र. ४, संत जगनाडे महाराज चौक, तेलीपुरा, तळेगाव दशासर

दिनांक : २७ ऑगस्ट २०२६

वेळ : सकाळी १० ते दुपारी २

Post a Comment

Previous Post Next Post