घाटंजी : भारतीय निवडणूक आयोगाच्या विशेष सघन मतदार यादी पुनरिक्षण (SIR – Special Intensive Revision) कार्यक्रमांतर्गत घाटंजी तहसील कार्यालयात नागरिकांच्या सोयीसाठी विशेष हेल्प डेस्कची स्थापना करण्यात आली आहे.
या हेल्प डेस्कच्या माध्यमातून घाटंजी तालुक्यातील नागरिकांना SIR कार्यक्रमाची सविस्तर माहिती, मतदार नोंदणीसाठी आवश्यक अर्ज (फॉर्म) भरण्याबाबत मार्गदर्शन, आवश्यक कागदपत्रांची माहिती तसेच मतदार यादीसंदर्भातील दावे व हरकती दाखल करण्याबाबत सहाय्य करण्यात येणार आहे.
या उपक्रमाची सुरुवात तहसीलदार विजय साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. हेल्प डेस्कवर निवडणूक नायब तहसीलदार दिलीप राठोड, तज्ञ तांत्रिक सहाय्यक अभिजीत झाडे, महसूल सहाय्यक संदीप इंगोले, ऑपरेटर राजेश राठोड आणि अजय शिरपूरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रशासनाने घाटंजी तालुक्यातील सर्व पात्र नागरिकांनी या हेल्प डेस्कचा जास्तीत जास्त लाभ घेऊन मतदार नोंदणी, दुरुस्ती व इतर निवडणूक विषयक कामे वेळेत पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे.


