डॉ. व्यंकट घोडके यांना 'एक्सलन्स इन अकॅडमिक गव्हर्नन्स २०२६' पुरस्काराने गौरव

 



पुणे | प्रतिनिधी

एआयएसएसएमएस इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (AISSMS IOIT), पुणे येथील प्रशिक्षण व प्लेसमेंट विभागाचे अधिष्ठाता (डीन – ट्रेनिंग अँड प्लेसमेंट) डॉ. व्यंकट घोडके यांना प्लस नाईन वन मीडिया आयोजित पुणे एज्युकेशन कॉन्क्लेव्ह २०२६ मध्ये 'एक्सलन्स इन अकॅडमिक गव्हर्नन्स २०२६' या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

शैक्षणिक प्रशासनातील प्रभावी नेतृत्व, उद्योग–शैक्षणिक संस्थांमधील सक्षम समन्वय, विद्यार्थी कौशल्यविकास आणि रोजगारक्षमतेसाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना हा बहुमान प्रदान करण्यात आला.

पुरस्कार स्वीकारल्यानंतर डॉ. घोडके यांनी मा. श्रीमंत मालोजीराजे छत्रपती, एआयएसएसएमएस संस्थेचे व्यवस्थापन, प्राचार्य डॉ. पी. बी. माने यांचे मार्गदर्शन, विश्वास आणि सातत्यपूर्ण पाठबळाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. तसेच संस्थेतील सर्व प्राध्यापक, कर्मचारी, उद्योग क्षेत्रातील सहकारी, माजी विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांच्या सहकार्याबद्दल त्यांनी मनःपूर्वक आभार मानले.

यावेळी बोलताना त्यांनी हा सन्मान संपूर्ण AISSMS IOIT परिवाराचा असल्याचे सांगत, गुणवत्तापूर्ण शिक्षण, उद्योग–शैक्षणिक सहकार्य आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी भविष्यातही अधिक जोमाने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.

डॉ. व्यंकट घोडके यांच्या या उल्लेखनीय यशामुळे एआयएसएसएमएस इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, पुणेच्या शैक्षणिक गुणवत्तेला आणखी एक मानाचा तुरा लाभला असून, संस्थेच्या शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील योगदानाला नवी उंची प्राप्त झाली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post