Dhamangav railway | दत्तापूर पोलिसांचा शास्त्री चौकात ठिय्या; अल्पवयीन चालकांवर कारवाईचा बडगा

 

Dhamangav railway

दत्तापूर पोलिसांचा शास्त्री चौकात ठिय्या; अल्पवयीन चालकांवर कारवाईचा बडगा

सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन गजभारे ॲक्शन मोडवर

जिल्हा प्रतिनिधी निलेश रामगावकर 

अमरावती | धामणगाव रेल्वे प्रतिनिधी : शालेय वर्ग सुरू झाल्यापासून शहरात अल्पवयीन दुचाकीस्वारांकडून वाहतूक नियमांचे मोठ्या प्रमाणात उल्लंघन होत असल्याच्या पार्श्वभूमीवर दत्तापूर पोलिसांनी कठोर भूमिका घेतली आहे. दत्तापूर पोलीस ठाण्याचे नवनियुक्त ठाणेदार गजानन म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन गजभारे यांनी शास्त्री चौकात विशेष तपासणी मोहीम राबवत नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाईचा बडगा उगारला.

या मोहिमेदरम्यान अल्पवयीन दुचाकीस्वार, ट्रिपल सीट प्रवास करणारे तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. अल्पवयीन चालकांची वाहने जप्त करून ती थेट पोलीस ठाण्यात जमा करण्यात येत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.

कारवाईदरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन गजभारे स्वतः रस्त्यावर उतरून तपासणी करत होते. त्यांच्या समवेत महिला पोलीस अधिकारी पुसदकर, वाहतूक पोलीस रवी पाखरे, नवनाथ खेडेकर तसेच दत्तापूर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

पोलिसांनी पालकांना आपल्या अल्पवयीन मुलांना वाहन चालविण्यास देऊ नये, तसेच सर्व वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन केले आहे.


Maharashtra police


Post a Comment

Previous Post Next Post