BLO जबाबदारीतून मुक्त करा; महागावच्या आशा स्वयंसेविकांचे तहसीलदार यांना निवेदन

 



  श्रीकांत राऊत यवतमाळ प्रतिनिधी 

महागाव : तालुक्यातील आशा स्वयंसेविकांनी तहसीलदार यांना निवेदन देत BLO (Booth Level Officer) म्हणून नेमण्यात आलेल्या आशा कर्मचाऱ्यांना या कामातून मुक्त करण्याची मागणी केली आहे.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, शासनाकडून आशा स्वयंसेविकांवर आधीच सुमारे ७८ प्रकारच्या आरोग्यविषयक जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत. त्यामुळे अतिरिक्त BLO कामाचा भार पेलणे कठीण होत असून, आरोग्य सेवा व सर्वेक्षणाच्या कामावर त्याचा परिणाम होत आहे.

त्यामुळे आशा स्वयंसेविकांना BLO कामातून तात्काळ मुक्त करण्यात यावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. शासनाने याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा स्वयंसेविकांनी व्यक्त केली.

या निवेदनावर तालुक्यातील अनेक आशा स्वयंसेविकांच्या स्वाक्षऱ्या असून, संबंधित प्रशासनाने या मागणीची दखल घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे या वेळी उपस्थित आशा सेविका माया ठमके शुभांगी सुकळकर जया सुकळकर उषा पाडोळे अश्विनी राऊत सिंधुताई राठोड प्रतिभा लोखंडे शोभा बोंडारे निकिता कदम आशा सपना कांबळे मंगला काळे शांता ठाकरे संगीता आडे आरती उघडे उज्वला राजने राखी आढाव सुनिता जाधव गीता वाघमारे माया पाईकराव शोभा पडघणे सुजाता वाठोरे हे होत्या.


"शासनाने आमच्यावर आधीच ७८ प्रकारच्या आरोग्यविषयक जबाबदाऱ्या सोपवल्या आहेत. गावागावात माता-बालक आरोग्य, लसीकरण, सर्वेक्षण आणि जनजागृतीची कामे आम्ही प्रामाणिकपणे पार पाडतो. अशा परिस्थितीत BLO चे अतिरिक्त काम करणे अत्यंत कठीण होत आहे. त्यामुळे आम्हाला BLO च्या कामातून मुक्त करून आरोग्य सेवेवर पूर्णवेळ लक्ष केंद्रित करण्याची संधी द्यावी."

 माया ठमके . विद्या कावळे  ,आशा  स्वयंसेविका

आशा स्वयंसेविकांनी सांगितले की, आधीच त्यांचे मानधन नियमित व वेळेवर मिळत नाही. त्यातच BLO ची अतिरिक्त जबाबदारी सोपविण्यात आल्याने आरोग्य सेवा आणि इतर कामांवर परिणाम होत आहे. त्यामुळे शासनाने आशा स्वयंसेविकांना BLO कामातून तातडीने मुक्त करावे आणि मानधन वेळेवर अदा करण्याची प्रभावी व्यवस्था करावी, अशी मागणी त्यांनी केली.

Post a Comment

Previous Post Next Post