घाटंजी शहर व तालुक्यात SIR संदर्भातील बूथप्रमुखांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

 


Reporter


घाटंजी : मा. प्रा. आमदार राजूभाऊ तोडसाम यांच्या प्रमुख उपस्थितीत घाटंजी शहर व तालुक्यातील सर्व बूथप्रमुखांची SIR संदर्भातील महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.

बैठकीत SIR अभियानाची प्रभावी अंमलबजावणी, बूथनिहाय नियोजन, मतदार यादीची पडताळणी, संघटनात्मक समन्वय तसेच प्रत्येक बूथवर जबाबदारीने कार्य करण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी आमदार राजूभाऊ तोडसाम यांनी प्रत्येक बूथप्रमुखाने सक्रियपणे काम करून संघटना अधिक बळकट करण्यासाठी आणि SIR अभियान यशस्वी करण्यासाठी पूर्ण क्षमतेने कार्य करण्याचे आवाहन केले.

Post a Comment

Previous Post Next Post