अखिल भारतीय ओबीसी सेवा संघटना महाराष्ट्र राज्य कोअर कमिटी जाहीर; डॉ. शाम जाधव यांची नाशिक जिल्हा उपाध्यक्षपदी निवड




विशेष प्रतिनिधी : अनिल बंगाळे

पुणे : महायुती सरकारमध्ये अधिकृत घटक पक्ष संघटना म्हणून कार्यरत असलेल्या अखिल भारतीय ओबीसी सेवा संघटनेची महाराष्ट्र राज्यस्तरीय बैठक आज पुणे येथे पार पडली. या बैठकीत संघटनेच्या महाराष्ट्र राज्य कोअर कमिटीची घोषणा करण्यात आली.

संघटनेचे अध्यक्ष मा. श्री. हनुमंतजी सुतार यांच्या आदेशानुसार झालेल्या या बैठकीत डॉ. शाम जाधव (नाशिक) यांची नाशिक जिल्हा उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.

तसेच महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्षपदी नानासाहेब टेंगले (पुणे), अध्यक्षपदी प्रवीण चव्हाण (मुंबई), प्रवक्त्या म्हणून वंदना कुमावत, महाराष्ट्र राज्य सरचिटणीसपदी सौ. नंदा बागुल (अहिल्यानगर), खजिनदारपदी तसेच पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीसपदी सौ. स्मिता गुरव (कोल्हापूर) आणि सांस्कृतिक आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदी कुमारी आकांक्षा कुंभार (सांगली) यांची निवड करण्यात आली.

नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांवर संघटनेच्या कार्याची जबाबदारी सोपविण्यात आली असून, एकजूट आणि एकमताने समाजहिताचे कार्य अधिक सक्षमपणे पुढे नेण्याचे आवाहन करण्यात आले. नव्या कोअर कमिटीच्या माध्यमातून संघटनेचे कार्य अधिक मजबूत व प्रभावी होईल, अशी अपेक्षा समाज बांधवांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, नवनिर्वाचित सर्व पदाधिकाऱ्यांवर विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post