पोलिस स्टेशन उमरखेड हद्दीत अवैध पिवळी रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर जप्त; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

 



पोलिस स्टेशन उमरखेड हद्दीत अवैध पिवळी रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर जप्त; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई


 प्रतिनिधी श्रीकांत राऊत यवतमाळ 


उमरखेड :-जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ यांनी उमरखेड पोलीस स्टेशन हद्दीत अवैध पिवळ्या रेतीची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई करून चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यात अवैध धंदे, अवैध शस्त्र बाळगणारे, फरार आरोपी आणि अवैध उत्खनन करणाऱ्यांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्यानुसार दिनांक ११ जून २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक उमरखेड उपविभागात गस्त घालत असताना गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, उमरखेड ते विडूळ मार्गावर एका ट्रॅक्टरद्वारे विनापरवाना पिवळ्या रेतीची वाहतूक केली जात होती. त्यानुसार चुरमुरा फाटा परिसरात सापळा रचून पोलिसांनी ट्रॅक्टर अडविला. तपासणीदरम्यान ट्रॅक्टरमध्ये अवैधरित्या पिवळी रेती वाहतूक होत असल्याचे निष्पन्न झाले.

या कारवाईत ट्रॅक्टर व त्यामधील पिवळी रेती असा एकूण ४ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच आरोपी बबलू मारोती देवकर, रा. भगतसिंग वॉर्ड, उमरखेड याला ताब्यात घेण्यात आले.

याप्रकरणी उमरखेड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) तसेच महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ मधील कलम ४८(८) व ४७(७) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंथा, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश चव्हरे सहायक पोलीस निरीक्षक अमोल राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही यशस्वी कारवाई पार पाडली.

Post a Comment

Previous Post Next Post