गावाकडची बातमी|बेलोरा शेतशिवारात तळेगाव दशासर पोलिसांची धडक कारवाई; बेंबळा नदीकाठची गावठी दारूभट्टी उद्ध्वस्त,महिला अटकेत
जिल्हा प्रतिनिधी | निलेश रामगावकर
तळेगाव दशासर : अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेअंतर्गत तळेगाव दशासर पोलिसांनी बेलोरा शेतशिवारातील बेंबळा नदीच्या काठावरील गावठी हातभट्टीवर धडक कारवाई करत दारूभट्टी उद्ध्वस्त केली. या कारवाईत एक महिला दारू गाळताना रंगेहात आढळून आली असून तिला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार रात्री सुमारे ११ वाजताच्या सुमारास पंचांसह छापा टाकण्यात आला. पंचनामा दरम्यान ११ लिटर तयार हातभट्टी दारू, २१० लिटर मोहमाचा सडवा, ८ किलो युरिया आणि १ किलो नवसागर असा एकूण ४८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
तपासादरम्यान हातभट्टी दारूची नशा वाढविण्यासाठी युरिया व नवसागराचा वापर केला जात असल्याची माहिती समोर आली. हे पदार्थ मानवी आरोग्यास अत्यंत घातक असून अशा प्रकारे तयार करण्यात आलेली दारू विषारी ठरून जीवितास धोका निर्माण होऊ शकतो, असे पोलिसांनी नमूद केले आहे.
या प्रकरणी तळेगाव दशासर पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक १३५/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १२३, २७४, २७५ तसेच महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ६५(फ), ६५(क), ६५(ड) व ६५(इ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी महिलेला अटक करून न्यायालयात हजर
Tags : #TalegaonDashasarPolice #Belora #IllegalLiquor #HandBhatti #AmravatiNews #PoliceAction #CrimeNews #BemblaRiver #MaharashtraNews #LiquorRaid #BreakingNews #AmravatiRural #MarathiNews #TalukaNews #LocalNews

