महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाच्या नांदेड ग्रामीण अनुसूचित जाती जमाती (एसटी) किनवट तालुका ब्लॉक अध्यक्षपदी शेषराव चारोळे यांची नियुक्ती झाल्याबद्दल मोहपूर येथे त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. या निवडीमुळे परिसरात आनंदाचे वातावरण असून, गावकऱ्यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी बोलताना शेषराव चारोळे यांनी, पक्षाने माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावर विश्वास ठेवून महत्त्वाची जबाबदारी सोपवली असून, त्या विश्वासाला पात्र ठरत प्रामाणिकपणे, कर्तव्यनिष्ठेने आणि पक्षाच्या विचारांशी एकनिष्ठ राहून कार्य करणार असल्याचे सांगितले. तसेच सत्कारासाठी पुढाकार घेतलेल्या ग्रामस्थांचे आणि उपस्थित मान्यवरांचे त्यांनी आभार मानले.
या सत्कार सोहळ्याला डॉ. पुंडलिक आमले, डॉ. रामा तरटे, ह.भ.प. नागोराव शिरडे महाराज, माजी सरपंच तुकाराम भिसे, काशिनाथ खुडे, दिगांबर खुडे, डॉ. शिवाजी बोथिंगे, विजय खुडे, प्रभाकर दर्शनवाड, संजय खराटे, रघुनाथ आमले, माधव आमले, नामदेव आमले, विजय झळके, बालाजी भुरके, सुशांत इंगळे, पत्रकार अनिल बंगाळे तसेच अनेक सामाजिक कार्यकर्ते, मान्यवर आणि समस्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थितांनी शेषराव चारोळे यांना नव्या जबाबदारीबद्दल शुभेच्छा देत, त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे संघटन अधिक बळकट होईल, असा विश्वास व्यक्त केला.

