गावाकडची बातमी प्रतिनिधी माहुर किनवट पंकज जयस्वाल मो.9421367593
स्वामीनारायण गुरुकुल स्कूल हैदराबाद येथे सातवीच्या वर्गात श्रीकांत पाटील (वायफनीकर) याने प्रथम क्रमांक मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. ग्रामीण भागातील वायफनी गावचे स्वर्गीय आशीर्वाद साहेबराव पाटील यांचा नातू असलेल्या श्री ने आपल्या मेहनतीच्या जोरावर हे यश मिळवून गावाचे नाव उज्ज्वल केले आहे.
या यशामुळे वायफनी गावासह परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. स्वामीनारायण गुरुकुल स्कूलमधील शिस्त, संस्कार आणि कुटुंबापासून दूर राहून केलेला अभ्यास यामुळेच हे यश शक्य झाल्याचे श्री ने सांगितले.
यावेळी श्री ने आपल्या सर्व शिक्षकांचे मनःपूर्वक आभार मानले. तसेच परिवारातील आजी अश्विनी आशीर्वाद पाटील, आई-वडील आणि काका पिंटू आशीर्वाद पाटील यांचेही विशेष अभिनंदन करण्यात आले.एवढ्या कमी वया मध्ये घरापासून दूर राहून श्री घरापासून दूर राहून यश संपादन केले
या यशामुळे श्री वर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत असून भविष्यातही तो अशीच उज्ज्वल कामगिरी करेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
