प्रतिनिधी, निलेश रामगावकर
तळेगाव दशासर : स्थानिक येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान मास निमित्त संपूर्ण महिनाभर दैनंदिन श्रद्धांजली अर्पण करून शेवटी पुण्यतिथी ला त्यांची शेवटची न निघालेली अंत्ययात्रे चे स्मरण म्हणून श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान च्या माध्यमातून दरवर्षी मुकपदयात्रेचे आयोजन केल्या जाते. तरी या मुकपदयात्रे मध्ये सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान तळेगाव विभाग च्या वतीने करण्यात येत आहे.
टीप: मुकपदयात्रा ही दिनांक १८ मार्च २०२६ दिवस बुधवार रोजी सायंकाळी ६ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून निघणार असून संपूर्ण गावाला प्रदर्शना घेऊन श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सामुहिक श्रद्धांजली देऊन समापन होणार आहे.
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान तळेगाव.द प्रमुख सचिन मारोतराव भोयर यांनी सर्व गावकऱ्यांना मुकपद यात्रेत सहभागी होण्या करीता विनंती केली आहे.
