प्रतिनिधी निलेश रामगावकर
तळेगाव दशासर :- स्थानिक येथील शशी इंग्लिश स्कूल तळेगाव दशासर प्राथमिक व उच्च माध्यमिक येथील 23 ते 26 फेब्रुवारी दरम्यान सांस्कृतिक कार्यक्रम स्नेहसंमेलन पार पडले या दरम्यान 23 फेब्रुवारी रोजी बाल क्रीडा महोत्सव घेण्यात आला. यावेळी उद्घाटन केंद्रप्रमुख अनिल ठाकरे सर यांनी केले.
24 फेब्रुवारी ला पालक क्रीडा स्पर्धा , पाककला स्पर्धा ,पुष्प सजावट स्पर्धा ,पोस्टर मेकिंग व आनंद मेळावा इत्यादी कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी पांडे मॅडम कन्या हायस्कूल तळेगाव दशासर यांच्या हस्ते करण्यात आले तसेच 25 फेब्रुवारी बुधवार रोजी सांस्कृतिक कार्यक्रम" नृत्यतरंग " या कार्यक्रमाला संस्थाध्यक्ष माधवीताई निलेश गायकवाड, संस्था सचिव श्री निलेश गायकवाड, मुख्याध्यापिका शितल चौधरी, पंकज गायकवाड, गोविंदराव तसेच एसबीआयचे व्यवस्थापक जोशी मंचावर उपस्थित होते. तसेच अध्यक्ष माधवी गायकवाड, सदस्य ज्ञानेश्वर टोपले, संगीता टोपले हे होते. या कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट नृत्य सादर केले. व 26 फेब्रुवारी गुरुवार रोजी सत्कारमूर्ती प्राविण्य देशमुख अध्यक्ष माणुसकी बहुउद्देशीय संस्था व सभापती न.प.चांदुर रेल्वे, राहुल वानखडे पोलीस उपनिरीक्षक पोलीस स्टेशन तळेगाव दशासर, डॉ.अभिषेक कोल्हे एम.डी.एस (दंतवक्रता व दंतमुख्य) चांदुर रेल्वे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. कार्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण करण्याकरिता शिक्षिका व शिक्षक शाळेतील इतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
Tag: #शशीइंग्लिशस्कुल, #संस्कृती, #स्नेहसमेलन, #कार्यक्रम, #शाळेचेकार्यक्रम, #विद्यारंभ, #शिक्षण, #मुंबई, #संस्कृतिकलाप, #भारतीयसंस्कृती, #विद्यार्थी, #शिक्षिका, #संस्कृतीविकास, #संस्कार, #शालेतीलसांस्कृतिककार्यक्रम



