श्री तुळशीरामजी पाटील विद्यालय नालवाडा ची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम

 

School ,students



श्री तुळशीरामजी पाटील विद्यालय नालवाडा ची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम 100% लागला निकाल. 


ग्रामीण शिक्षण संस्था काँग्रेस नगर द्वारा संचालित श्री तुळशीरामजी पाटील विद्यालय नालवाडा तालुका दर्यापूर या शाळेचा उत्कृष्ट निकालाची परंपरा यंदाच्या वर्षी देखील शाळेच्या विद्यार्थ्यांनी कायम ठेवली आहे.फेब्रुवारी मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या शालांत परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला आहे.यावर्षी शालांत परीक्षेत एकूण 25 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते.. त्यापैकी अकरा विद्यार्थिनी प्राविण्य श्रेणी प्राप्त केले तर १० विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले.

विद्यार्थी, गावाकडची बातमी


     तसेच 4 विद्यार्थी द्वितीय श्रेणत उत्तीर्ण झालेत.या उत्कृष्ट निकालाच्या परंपरा बद्दल ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वानखडे संस्थेचे सचिव शुभम वानखडे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. तसेच शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक वृंद कर्मचारी यांचे देखील उत्कृष्ट निकालाबाबत अभिनंदन केले आहे.यावर्षीच्या निकालामध्ये . आचल अरविंद नांदने 90.40%,यश गोविंद तायडे 84.40% सानिका गजानन धोटे 83. 80% भक्ती सुधीर गावंडे 83.20% आनंदी अरविंद नितोने 82.20% पूर्वा अरविंद कडू ,80.20% वेदिका रुपेश खांडेकर 79.80% गुण प्राप्त करून यश मिळवले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post