इस्माईल दगू जनसेवा फाउंडेशन तर्फे जिल्हा पोलीस अधीक्षक यांचा सत्कार

 


Nandurbar :- नंदुरबार येथील दिनांक 23-5- 2025 शुक्रवार रोजी नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रावण दत्त एस यांना पोलीस महासंचालकांचे सन्मान चिन्ह उल्लेखनीय कार्य व प्रशासकीय सेवा केल्याबद्दल सन्मानचिन्ह मिळाले म्हणून इस्माईल दगू जनसेवा फाउंडेशन नंदुरबार तर्फे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यलयात त्यांच्या जंगी सत्कार शाल श्रीफळ गुलाब पुष्प ट्रॉफी देऊन करण्यात आले.

    श्रावण दत्त एस यांनी परभणी सेलू येथे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून कार्यरत असताना सेलू पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा खून व खुनाचा कट रचने असे अनेक गंभीर आणि कीलिस्ट प्रकरणातील गुन्ह्याच्या शास्त्रोक्त पद्धतीने तपास केला होता व अनेक गुन्ह्याच्या उत्कृष्ट तपास केला होता विशेष आरोपींना शिक्षाही झाली होती.

   म्हणून पोलीस विभागाकडून नंदुरबार जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक श्रावण दत्त एस यांना पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह मिळाले बद्दल वो खास करून नंदुरबार जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षकांचे पदभार स्वीकारले कमी दोन वर्ष झाले असताना नंदुरबार जिल्ह्यात आज पर्यंत अवैध धंदे बंद विमल गुटखा बंदी नंदुरबार जिल्ह्यात सर्व सण उत्सव शांतता मय वातावरणात व नंदुरबार जिल्ह्यात अतिशय चांगली कामगिरी केल्याबद्दल आम्ही इस्माईल दगू जनसेवा फाउंडेशन तर्फे त्यांच्या कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक श्रावण दत्त एस यांच्या संस्थेतर्फे त्यांच्या जंगी सत्कार सन्मान शाल ट्रॉफी गुलाब पुष्पगुच्छ देऊन आज रोजी करण्यात आले.

Gavakadachi Batmi


    यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष एजाज बागवान या संस्थेचे कायदे तज्ञ सल्लागार व सामाजिक कार्यकर्ते एडवोकेट मजहर शेख, मन्यार समाजाचे जिल्हा उपाध्यक्ष नासिर मनियार, बागवान समाजाचे उपाध्यक्ष नासिर बागवान ,शिवसेना शहर प्रमुख सामाजिक कार्यकर्ते छन्नू पठाण,ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन चे शहर उपाध्यक्ष अजीम बागवान, आदींची उपस्थिती होती.

Post a Comment

Previous Post Next Post