तस्करांनी तहसीलदारांच्या वाहनाच्या पुढे तीन मोटरसायकली चालविल्याने ट्रॅक्टर गेली पळून

 


नायब तहसीलदारांनी केला तीन ट्रॅक्टरचा सहा किलोमीटर पाठलाग


             छायाचित्र- ईलीयास बावानी माहूर

ट्रॅक्टर चालक-मालक आणि मोटरसायकल चालकाविरुद्ध गुन्हा दाखल दोन मोटरसायकली जप्त



आठवड्यातील दुसरी घटना सिदखेड हद्दीत सरकारी कामात अडथळा केल्याचा गुन्हा दाखल पथक प्रमुखांसोबत शस्त्रधारी पोलिसांची नेमणूक करा मागणी



श्रीक्षेत्र माहूर  : माहूर तालुक्यातील मौजे हडसनी येथील वाळू तस्करांनी तीन ट्रॅक्टर मध्ये वाळू भरून आनमाळ येथे विक्रीसाठी नेत असताना तहसीलदार किशोर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसिलदारडॉ राजकुमार राठोड यांचे सह कर्मचाऱ्यांनी त्यांचा पाठलाग केल्याने वाळूने भरलेले ट्रॅक्टर परत जुनी हडसणी मार्ग नदीकडे पळवून नेत असताना वाळू तस्करांनी तीन मोटरसायकली तहसीलदारांच्या वाहनाच्या पुढे हळू चालविल्याने हा पाठलाग तब्बल पाच ते सहा किलोमीटर सुरू असल्याने ट्रॅक्टरला पैनगंगा नदी पात्रातून विदर्भात पळून जाण्यात यश आले ना तहसिलदार डॉ राजकुमार राठोड यांनी मोटरसायकल स्वरांना पकडण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी मोटरसायकल सोडून आता तुमचे अति होत आहे तुम्हाला बघून घेतो अशा धमक्या देत पळ काढल्याने दोन मोटरसायकल माहूर पोलीस ठाण्यात जप्त करण्यात आल्याची घटना दि 1 रोजी 3 ते 4 वाजता च्या दरम्यान झाली आहे वाळू तस्करांचा सुरू असलेल्या पाठलाग बघण्यासाठी नागरिकांनी आपल्या मोटरसायकली या पळापळीच्या मागे लावून घटनेची शूटिंग करत सोशल मीडियावर टाकल्याने चर्चांना उधाण आले असून दोन दिवसाआधी महसूल पथकातील अधिकारी कर्मचाऱ्यांना धमकी देण्याचा गुन्हा सिदखेड पोलिसात दाखल झाल्याने महसूल पथका सोबत तात्काळ शस्त्रधारी पोलिसांची नेमणूक करावी अशी मागणी होत आहे.

      हडसनी येथील वाळू तस्करी करणारे अनेक दिवसापासून वाळू तस्करी करत असल्याची माहिती मिळाल्याने पोलीस पाटील दिलीप नरवडे यांनी सूचना दिल्यावरून नायब तहसीलदार डॉ राजकुमार राठोड यांची त्यांचे सह तलाठी सी पी बाबर कोतवाल विष्णू देव्हारे किसन नथू लोखंडे कोतवाल कैलास खूपसे तंटामुक्ती अध्यक्ष सुखालाल फरीदा राठोड हे होते आणमाळ घाटावर तीन ट्रॅक्टर वाळूने भरलेले येत असताना त्यांनी बघितले त्यांना थांबवण्याचा इशारा केला.

असता सगळ्यांनी ट्रॅक्टर न थांबवता पळ काढला तसेच वरील तिघांनी आपापल्या मोटरसायकली ट्रॅक्टरचे मागे लावल्या तसेच शासकीय वाहन जवळ आले असता शासकीय वाहणाला भिडूनच मोटरसायकली चालवल्या काही अंतरावर त्यांनी रस्त्यात मोटरसायकल फेकून देत रस्ता अडविल्याने ट्रॅक्टर चालकांनी पैनगंगा नदी पात्रातून ट्रॅक्टर विदर्भात पळवून नेले त्यामुळे ट्रॅक्टर पकडता आले नाही सदर घटनेचा पाठलाग सुरू असताना नायब तहसीलदार राजकुमार राठोड यांना धोक्याच्या ठिकाणाहून वाहन चालवावे लागल्याने जीव धोक्यात घालूनही ट्रॅक्टर चालकांना ट्रॅक्टर पळवून नेण्यात यश आले तर रस्त्यात टाकून दिलेल्या दोन मोटरसायकली नातह डॉ राजकुमार राठोड यांनी जप्त करत माहूर पोलीस ठाण्यात आणून जमा केल्या आहेत मौजे अनमाळ चे पोलीस पाटील दिलीप किसन नरवाडे यांनी फिर्याद दिल्याने दोघा विरुद्ध शासकीय कामात अडथळा करणे चोरांना मदत करणे इतर कलमाखाली गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सपोनी शिवप्रकाश मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोउपनी पालसिंग ब्राह्मण पोहेका गजानन चौधरी पोका रोहित इंगोले पोका पवन राऊत हे करीत आहे.

     काही दिवसापूर्वी पडसा येथे तलाठ्यांना धमकी दिल्याप्रकरणी सिंदखेड पोलीस ठाण्यात दोघा विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून पथक प्रमुख डॉ राजकुमार राठोड यांनाही कालच्या घटनेत गंभीर दुखापती होण्याची शक्यता होती परंतु सुदैवाने ते बालम बाल बचावले तसेच जाता जाता तस्करांनी आता तुमचे अति होत आहे तुम्हाला बघून घेऊ अशा धमक्या दिल्याने यानंतर अशी घटना घडल्यास महसूल पथकातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे काही बरे वाईट होण्याआधी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार तसेच सहाय्यक जिल्हाधिकारी मेघना कावली यांनी घटनेची दखल घेऊन महसूल पथका सोबत दोन शास्त्रधारी पोलिसांची तात्काळ नेमणूक करावी अशी मागणी होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post