सिन्नर आगासखिंड { प्रतिनिधी डॉ शाम जाधव } आज दिनांक ७/२/२०२५ रोजी माता रमाई यांची १२७ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी निमित्त आगासखिड येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते आयोजक संतोष विलास जगताप, सुनिल नामदेव जगताप माजी सरपंच दतूभाऊ आरोटे सोसायटी चेरमन अशोक जाधव ,माजी संचालक बाळासाहेब बरकले माजी सरपंच मधुकर लांहगे, सरपंच ज्योती लाहगे सामाजिक कार्यकर्ते सुनील नामदेव जगताप आयोजकांनी नामांकित डॉक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य असे शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
त्यामध्ये नेत्र तपासणी, बीपी तपासणी, शुगर तपासणी, वजन तपासणी, उंची तपासणी व नियमित आहार कसा संकलन कराव याची मार्गदर्शन सुद्धा डॉक्टर प्राजक्ता जठार मॅडम यांचे हे या ठिकाणी मार्गदर्शन लाभले डॉक्टर . प्राजक्ता जठार
डॉक्टर . हर्षदा तळेगावकर, सिद्धार्थ गोरे ,रवी कुलकर्णी ह्या सर्व डॉक्टर टीमने माता रमाई यांचे वंदन करून आलेल्या सर्व रुग्णांची तपासणी सुरू केली.
या तपासणीसाठी उत्तम असा प्रतिसाद मिळाला असून सर्व गावातील वृद्ध महिला आभाळ तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते नेत्रदान हे श्रेष्ठ दान होय त्याची तपासणी म्हणजे जग दाखवण्याची दिशा होय अशा ह्या मंगलप्रसंगी आयोजक संतोष विलास जगताप व सुनील जगताप यांच्या अथक परिसरामाने ह्या शिबिराच्या आयोजन करण्यात आले होते तसेच गावातील प्रतिष्ठित पदाधिकारी व नागरी यांच्या सहमताने उस्फुर्त असा प्रतिसाद मिळाला एकच आमचा ध्येय होय एकीचा हात मदतीचा पुढे यामध्ये गावाचा विकास सदा मार्गाने जाण्याचा मार्ग होय गावचे सरपंच व पदाधिकारी यांनी असे ग्वाही केली की कुठलेही सामाजिक कार्यास आमचा सहभाग राहील कुठेही कमी पडून देणार नाही सदरील कार्यक्रमाचे आगासखिंड धम्मरत्न मित्र मंडळ यांचे सहकार्य लाभले आलेल्या सर्व पाहुण्यांचे आयोजकांनी आभार मानून त्यांची सत्कार केले हा कार्यक्रम अगदी आनंदी व प्रसन्न वातावरणात पार पडला.