अंबरनाथ(प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर)नव वर्षातील पहिला सण मकर संक्रांत.तिळ गुळ घ्या,गोड गोड बोला!त्यामुळे या मकर संक्रांतीच्या सणाचे औचित्य साधून उल्हासनगर येथील समाजसेवक,अॅन्टीपायरसी सेल मुंबई चे तपाशी अधिकारी रामजित गुप्ता यांनी अंबरनाथ नगरपरिषद अंतर्गत शहरी बेहर निवारा केंद्रातील आजी-आजोबांना कपडे व खाऊ वाटप करुन त्यांचा सण गोड केला.यावेळी जनजागृती सेवा संस्थेचे अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर,समाजसेवक-अॅन्टीपायरसी सेल मुंबई चे तपाशी अधिकारी रामजित गुप्ता,संतोष राय,गायत्री पांडे,राजकुमारी गुप्ता यांच्या हस्ते बेहर निवारा केंद्रातील आजी-आजोबांना कपडे व खाऊ वाटप करुन त्यांचे तोंड गोड केले.
सर्व प्रथम निवारा केंद्राचे व्यवस्थापक महादेव भारती यांनी सर्वांचे शब्दसुमनांनी स्वागत केले.त्यानंतर सर्व उपस्थित मान्यवरांनी संपुर्ण शहरी बेहर निवारा केंद्राच्या इमारतीची पहाणी केली.व्यवस्थापक महादेव भारती यांनी निवारा केंद्रातील आजी-आजोबांची देखभाल,नास्टा,जेवण,निवासी व्यवस्था या संदर्भात सविस्तर माहिती दिली.
याप्रसंगी निवारा केंद्रातील कर्मचारी रेखा ठकोलीया,कविता चूडासामा यांचेही सहकार्य लाभले.शेवटी शहरी बेहर निवारा केंद्रातील कर्मचा-यांनाही समाजसेवक रामजित गुप्ता यांजकडून मिठाई वाटप करुन कार्यक्रमाची सांगता झाली.