किनवट, अनिल बंगाळे : भविष्यात जागतिक तापमान वाढ रोखायची असल्यास वृक्ष लागवड करणे हे एकमेव उपाय आहे. बालवयापासूनच विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व समजावे त्यांच्या कडून भविष्यात पर्यावरणाविषयी संवर्धन यासाठी कार्य घडावे म्हणून स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असे सांगणारे लोकमान्य टिळक, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व वर्तमानातील मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त मलकापूर शाळेत चिमुकल्याच्या हस्ते वृक्षरोपण करण्यात येऊन या निमित्ताने त्यांना पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व समजून सांगण्यात आले.