पाळीव कुत्रा ‘भुरु’ आठ दिवसांपासून बेपत्ता; माहिती देण्याचे आवाहन
परतवाडा, गौरखेडा (कुंभी) : येथील संतोष भालेराव यांचा पाळीव कुत्रा ‘भुरु’ गेल्या आठ दिवसांपासून बेपत्ता आहे. परिसरासह आजूबाजूच्या भागात शोध घेऊनही अद्याप त्याचा ठावठिकाणा लागलेला नाही.
नागरिकांना ‘भुरु’ कुठेही आढळल्यास किंवा त्याच्याबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास तातडीने संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कुत्रा सुरक्षितपणे मिळवून देणाऱ्या व्यक्तीस योग्य बक्षीस देण्यात येणार आहे.
संपर्क : संतोष भालेराव – 96732 25711
