कोरपणा परिसरातील कथित अवैध धंद्यांवर कारवाईची मागणी

 



एसपींना निवेदन; गोमांस विक्री, गो तस्करी, अवैध दारू, सट्टा-मटका व ऑनलाइन लॉटरीवर कारवाईची मागणी


चंद्रपूर,कोरपणा : कोरपणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत कथितपणे सुरू असलेल्या विविध अवैध धंद्यांवर तातडीने कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करणारे निवेदन पोलीस अधीक्षक, चंद्रपूर यांना देण्यात आले.

निवेदनात परिसरात गोमांस विक्री, गो तस्करी, अवैध दारू विक्री, सट्टा-मटका तसेच ऑनलाइन लॉटरी यांसारखे प्रकार सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या कथित अवैध व्यवसायांमुळे परिसरातील कायदा व सुव्यवस्थेवर परिणाम होत असल्याचे निवेदनकर्त्यांचे म्हणणे आहे.


या निवेदनात कोरपणा पोलीस ठाण्याच्या ठाणेदार लता वाढवे यांच्या संगनमताने हे अवैध धंदे सुरू असल्याचा आरोप करण्यात आला असून, या आरोपांची वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत निष्पक्ष चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

तसेच कोरपणा परिसरातील अवैध धंद्यांवर विशेष मोहीम राबवून त्यांना आळा घालावा आणि नागरिकांना सुरक्षित वातावरण मिळावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. आणि ठाणेदार मुख्यालयात न राहत असल्याबद्दल पण तक्रार्या करण्यात आली .चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन.

हे निवेदन तिरुपती कन्नाके आणि सुधाकर ताजने यांनी पोलीस अधीक्षकांकडे सादर केले.

Post a Comment

Previous Post Next Post