तालुका प्रतिनिधी| विनोद आडे
आर्णी : महाराष्ट्र शासनाच्या “राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता” अभियानांतर्गत जिल्हा परिषद यवतमाळच्या वतीने विमुक्त जाती व भटक्या जमाती (VJNT) प्रवर्गातील नागरिकांसाठी विशेष मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर २० ते ३० सप्टेंबर या कालावधीत राबविण्यात येत आहे.
तालुका प्रतिनिधी विनोद आडे यांच्या माहितीनुसार, यवतमाळ जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्र म्हसोला अंतर्गत येणाऱ्या येरमल (हेटी) उपकेंद्रात या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिरामध्ये नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करून आवश्यकतेनुसार वैद्यकीय सल्ला व उपचार उपलब्ध करून दिले जात आहेत.
ग्रामीण व दुर्गम भागातील वंचित घटकांपर्यंत आरोग्याच्या सुविधा पोहोचविणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. परिसरातील नागरिकांनी या शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घेऊन आपली आरोग्य तपासणी करून घ्यावी, असे आवाहन स्थानिक प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
