परतवाडा/ संतोष भालेराव
गौरखेडा कुंभी (ता. अचलपूर) : तहसील निवडणूक अधिकारी यांच्या आदेशानुसार सन २०२६ या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभागातील ( वार्ड)आरक्षण निश्चिती कार्यक्रम दिनांक १२ जून २०२६ रोजी ग्रामपंचायत कार्यालय गौरखेडा कुंभी येथे पार पडला.
या बैठकीस अध्यासी अधिकारी तथा पंचायत समिती अचलपूरचे लेखाधिकारी श्री. राजाराम महादेव उके उपस्थित होते. तसेच ग्रामपंचायत अधिकारी हरिदास पातोंड, सरपंच (प्रशासक) तेजस्विनी भिडकर, तंटामुक्ती अध्यक्ष धर्मेंद्र सदांशिव, पोलीस पाटील सचिन बेदरकर, माजी उपसरपंच सदस्य रामा सदांशिव यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी व गावातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. यामध्ये मुरली पडोळे, नितीन शिंदे,पंकज महल्ले, अंकुश भिडकर, पवन बारखडे, छोटू चक्रे,संतोष भालेराव,उमेश कापसे आदी नागरिकांचा सहभाग होता.
बैठकीदरम्यान ग्रामपंचायत क्षेत्रातील लोकसंख्येच्या प्रमाणानुसार वार्ड आरक्षण निश्चितीची प्रक्रिया राबविण्यात आली. अध्यासी अधिकारी श्री. उके यांनी शासनाच्या परिपत्रकाचे वाचन करून उपस्थितांना आरक्षणाबाबत सविस्तर माहिती दिली. निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशांनुसार संपूर्ण कामकाज पारदर्शक पद्धतीने पार पडले.
गौरखेडा कुंभी ग्रामपंचायत क्षेत्राची एकूण लोकसंख्या ६२८९ असून अनुसूचित जातीची लोकसंख्या १८०७ तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या ८९० आहे. ग्रामपंचायतीच्या एकूण १५ सदस्य पदांसाठी सन २०२६ च्या सार्वत्रिक निवडणुकीत लोकसंख्येच्या प्रमाणानुसार खालीलप्रमाणे संभाव्य आरक्षण निश्चित करण्यात आले आहे –
प्रभाग क्र. १
अनुसूचित जाती (स्त्री)
अनुसूचित जमाती
सर्वसाधारण (स्त्री)
प्रभाग क्र. २
अनुसूचित जाती (स्त्री)
अनुसूचित जमाती (स्त्री)
सर्वसाधारण
प्रभाग क्र. ३
सर्वसाधारण
सर्वसाधारण (स्त्री)
सर्वसाधारण (स्त्री)
प्रभाग क्र. ४
अनुसूचित जाती
सर्वसाधारण (स्त्री)
सर्वसाधारण
प्रभाग क्र. ५
अनुसूचित जाती
नामाप्र (महिला)
सर्वसाधारण (स्त्री)
यावेळी उपस्थित नागरिकांनी आरक्षण प्रक्रियेबाबत समाधान व्यक्त केले. संपूर्ण कार्यक्रम शांततापूर्ण वातावरणात व शासनाने निर्धारित केलेल्या नियमांनुसार पार पडला.
