लोकमाता अहिल्याबाई उपभोगशून्य स्वामिनी...डॉ सतीश तराळ

 




जिल्हा प्रतिनिधी निलेश रामगावकर 

अमरावती :  पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर अठराव्याव्या शतकातील महान लोकमाता ,दैदीप्यमान स्त्रीरत्न, कर्त्यासुधारक व उपभोग शून्य स्वामिनी होत्या. वैराग्य आणि वीरता यांचे अद्भुत रसायन त्यांच्या रक्तात होते. त्या साठ वर्षे राज्यकारभार करणाऱ्या एकमेव, शिवरायाच्या शेवटच्या वारसदार व मराठी शाहीतील सुवर्ण युगाच्या निर्मात्या होत्या. अशा आशयाचे उद्गार डॉ सतीश तराळ यांनी काढले.

 अहिल्याबाई होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त विद्युत नगर येथील अहिल्याबाई होळकर चौकात आयोजित करण्यात आलेल्या अहिल्याबाई होळकर जयंती समारंभात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. बहुजन आघाडी व नवसारी मित्र मंडळ यांच्या वतीने एडवोकेट अचल कोल्हे व मित्रमंडळीने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. डॉ सतीश तराळ पुढे म्हणाले अहिल्याबाई निधर्मी ,सर्वधर्म समभाव जोपासणाऱ्या होत्या. त्या मराठ्यांच्या इतिहासातील अत्यंत कर्तबगार व दैदिप्यमान स्त्री रत्न होत्या. त्यांचे स्वतःचे जीवन दुःखाचे महाकाव्य असतानाही त्यांनी प्रचंड सामाजिक व राजकीय कार्य केले. त्यांनी उभारलेले स्त्री सैनिक दल ही अभूतपूर्व घटना आहे .पंचायत राज ची सर्व तत्वे त्यांच्या राज्यकारभागात होती. त्या आजच्या बचत गटांच्या प्रणेत्या होत्या. त्या अत्यंत न्यायनिष्ठ असून स्वतःच्या पती वर त्यांनी दंडात्मक कारवाई केली होती .त्यांनी कुप्रथांचे उच्चाटन केले. हुंडाबंदी , विधवा विवाह विवाहास प्रोत्साहन दिले. धार्मिक स्थळांचा विकास केला . ठिकठिकाणी अन्नसत्र सुरू केले.त्यांनी स्वतःच्या मुलीचा विवाह आदिवासी तरुणाशी लावून दिला होता. खरड्याच्या लढाईच्या विजयाचे श्रेय अहिल्याबाईंना आहे. त्यांच्यामध्ये शिवरायांचे प्रजा वात्सल्य व बुद्धाची करुणा होती. त्या इतिहासाला मिळालेली मोठी देणगी आहेत. त्या रशियन राज्यक्रांतीच्या प्रेरक होत्या. त्या प्रजेप्रमाणेच पशुपक्षी जलचर यांचीही काळजी घेत. वीरता ,वैराग्य, साधुत्व, साधेपणा परोपकाधरी वृत्ती , मुत्सद्यगिरी ,प्रजाहित दक्षता अशा कितीतरी गुणांचा संयोग त्यांच्या व्यक्तिमत्त्वात होता. त्या एक दैदीप्यमान अलौकिक व्यक्तिमत्व होत. त्यांच्यात शौर्य, पराक्रम, मुत्सद्यगिरी, योजकत्व, संघटनचातुर्य, इतरांवर प्रभाव पाडण्याची क्षमता इत्यादी गुण होते .त्यांना असामान्य बुद्धी कौशल्य लाभले होते. 

याप्रसंगी नगरसेवक प्रशांत महल्ले नगरसेवक ऋषिकेश देशमुख नगरसेविका सौ अनिताताई काळे उपस्थित होत्या. यावेळी प्रकाश बनारसे अक्षय देशमुख खटाळे गुरुजी डॉ.पातूर्डे श्री जवंजाळ व इतर काही मान्यवरांनी अहिल्याबाईंना आदरांजली अर्पण केली . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अविनाश पांडे होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अचल कोल्हे गजानन व्यवहारे वासुदेव रावकेचे, प्रफुल्ल इंगोले, गजानन मनोहरे, संदीप इंगळे, मिलिंद बोधिले, यांनी परिश्रम घेतले यावेळी देवी दासजी कोल्हे ,कृष्णराव कुलट अविनाश पांडे इत्यादी मंडळी उपस्थित होती.

Post a Comment

Previous Post Next Post