सर्वांनी भगवान परशुराम व जगत ज्योती महात्मा बसवेश्वर यांचा आदर्श अंगिकारावा-आमदार भीमराव केराम

 



 शहरातील जुन्या नगर पंचायतींच्या सभागृहात दिनांक 19 रोजी किनवट माहुर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार भीमराव केराम यांच्या अध्यक्षतेखाली भगवान परशुराम व जगत ज्योती महात्मा बसवेश्वर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी भगवान परशुराम व महात्मा जगत ज्योती महात्मा बसवेश्वर यांचा आदर्श सर्वांनी अंगिकारावा असे आवाहन केराम यांनी केले आहे.

सर्व प्रथम आमदार केराम यांच्या हस्ते वेद मंत्रांच्या घोषात भगवान परशुराम,व जगत ज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करण्यात आले.यावेळी जन्मोत्सव समितीच्या वतीने आमदार भीमराव केराम यांचा सत्कार करण्यात आला.दिनांक 20एप्रिल रोजी सायंकाळी वाद्यांच्या गजरात शहरातील प्रमुख मार्गावरून भगवान परशुराम व जगत ज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या तैलचित्राची शोभायात्रा काढण्यात आली.होती  या शोभायात्रेत हजारो भक्त सहभागी झाले होते.त्यानंतर शहरातुन जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते जगत ज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या नामफलकाचे अनावरण करण्यात आले.त्यानंतर आमदार केराम यांनी दत्तशिखर येथे पार पडलेल्या षोडषी कार्यक्रमात सहभागी होउन दत्तशिखर संस्थानचे महंत प.पु.प.श्री.श्री.श्री.1008 डॉ.धनेश्वर  उर्फ शाम भारती महाराज व जुन्या आखाड्याचे प.पु.प.श्री.श्री.श्री.महामंडलेश्वर अवधेशानंद गिरी महाराजांचे दर्शन घेतले.

 

यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष निळकंठ मस्के, शहराध्यक्ष तथा नगरसेवक गोपु महामुने, रुग्ण कल्याण समिती सदस्य अनिल वाघमारे,जेष्ठ कार्यकर्ते विजय आमले, नंदकुमार जोशी, जिल्हा उपाध्यक्ष श्रीकांत घोडेकर,माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक राजेंद्र केशवे,शाम कुमरे कैलास फड, दत्तात्रय शेरेकर,राजु मुडाणकर, शिवदत्त परसावळे,संतोष स्वामी,योगेश परसावळे अरुण घोडेकर , राजू सौंदलकर   ज्ञानेश्वर सवटे, किरण मुकटे ओमकार मुकटे अंकुश स्वामी बाबू स्वामी उमरा गजानन देवरसे ,,यांचेसह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.




Post a Comment

Previous Post Next Post