आरोपीची अल्पवयीन मुलीस पळून नेल्याचे प्रकरणातुन निर्दोष सुटका


 


           विशेष प्रतिनिधी/ भीमराव खंडारे 

खामगांव: मौजे खेर्डा येथील आरोपी संजय प्रकाश तायडे याने फिर्यादीची मुलीला दि.२९/०६/२०२२ रोजी रात्री ३.०० वाजता फिर्यादीची आई ही लघुशंकेला उठली असता, तिला घराला दरवाजा उघडा दिसला असता, त्याची अल्पवयीन मुलगी घरात नव्हती, तेंव्हा त्यांनी इतरत्र गावात शोध घेतला असता, ती मिळून आली नाही, नंतर आरोपी संजय प्रकाश तायडे याचे आईला विचारले असता, तिने सांगितले की, तिचा मुलगा सकाळीच मोटार सायकल घेवून घरून निघुन गेला. तरी आरोपी संजय तायडे यास मागील २ महिन्यापुर्वी समजावुन सांगुन सुध्दा त्याने फिर्यादीची अल्पवयीन मुलगी कु. प्राची हिस लग्न करण्याचे उद्देशाने फुस लावून पळून नेले आहे, अशा आशयाची तक्रार जळगांव जामोद पोलीस स्टेशन येथे फिर्यादीच्या फिर्यादवरून गुन्हा क्र.३९७/२०२२, भा.दं.वि. चे कलम ३६३, ३६६ प्रमाणे आरोपीविरूध्द दाखल करण्यात आला. त्यावरून तपासाअंती दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले.

       त्यावरून सदर खटला क्र.१२०/२०१३ नुसार खामगांव येथील वि. अतिरिक्त सत्र न्यायाधिश खामगांव यांचे न्यायालयात चालविण्यात आला. सदर खटल्यात आरोपीच्या बचावाकरीता ॲड. डी. एम. भगत यांनी वकीलपत्र दाखल केले. न्यायालयात एकुण ५ साक्षीदारांचे पुरावे नोंदविण्यात आले. सबळ पुराव्याअभावी व अंतिम युक्तीवाद ग्राह्य मानुन तसेच बचाव पक्षाचे सर्व मुद्दे व बाबी ग्राह्य धरून वि. अतिरिक्त सत्र न्यायाधिश खामगांव यांनी दि.२७/०२/२०२६ रोजी आरोपी यांना भा.दं.वि. चे कलम ३६३, ३६६ या गुन्ह्यातुन निर्दोष मुक्त केले आहे. सदर खटल्यात आरोपीचे वतीने ॲड. डी. एम. भगत, व सहाय्यक म्हणून ॲड. सचिन लहासे यांनी काम पाहिले.


#आरोपी, #अल्पवयीन, #मुली, #पळूननेणे, #निर्दोषसुटका, #कानून, #ज्युडिशियलसिस्टम, #महाराष्ट्र, #तपास, #अपराध, #न्याय, #कोर्ट, #बचाव, #सुरक्षा, #accused, #minor, #girl, #escape, #acquittal, #law, #judicialsystem, #maharashtra, #investigation, #crime, #justice, #court, #defense, #security

Post a Comment

Previous Post Next Post