"मुजावर मुतवली शेख बाबर फकीर मोहम्मद सज्जादानशीन साजिद उल्लाह जागीरदार यांनी अर्पण केली संदलची पवित्र चादर"
श्रीक्षेत्र माहूर : छायाचित्र ईलीयास बावानी
माहूर : शहरातील सुफी संत बाबा सोनापीर दर्गाह येथे दरवर्षी मोठ्या भक्ती भावात साजरा होणाऱ्या उर्साला दि 5 रोजी सुरुवात झाली असून दुपारनंतर परचम कुशाइ ध्वजारोहण झाल्यानंतर दर्गाह चे मुतवल्ली मुजावर शेख बाबर अहमद फकीर मोहम्मद यांचे सह सज्जादा नशीन साजिद ऊल्लाह जागीरदार यांचे सह हजारो भाविक भक्तांच्या उपस्थितीत बाबा सोनापीर दर्गाह मधील पवित्र मजार वर संदल सह पवित्र चादर अर्पण करण्यात आली.
दरवर्षी पाच दिवस चालणाऱ्या या उर्सात लाखो भाविक हजेरी लावतात पवित्र रमजान महिना असल्याने दररोज सायंकाळी सर्वधर्मीय भाविकांची प्रचंड गर्दी होते संदलच्या दिवशीही हजारो भाविकांनी संदल मध्ये सहभागी होऊन उर्सात आलेले आकाश पाळणे झुले लहान मुलांना खेळण्याच्या विविध कलाकृती सह शीत पेयाचे स्टॉल्स हॉटेल नाश्ता कपडे व इतर साहित्य मिळण्याचे स्टॉल्स लागल्याने आलेल्या भाविकासह नागरिकांनी मोठ्या प्रमाणात खरेदी करत बालगोपाला सोबत आनंदोत्सव साजरा केला..
पाच दिवस चालणाऱ्या या उर्सात कुठलीही आणि अनुचित घटना घडू नये म्हणून तहसीलदार अभिजीत जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी किरण कुमार भोंडवे ,पोलीस निरीक्षक देविदास चोपडे ,मुख्याधिकारी विवेक कांदे ,तालुका आरोग्य अधिकारी डॉ राजेश माचेवार ,वैद्यकीय अधीक्षक ओमप्रकाश साबळे, मरावीचे अभियंता राहुल शेंडे, नायब तहसीलदार कैलास जेठे, नायब तहसीलदार अरुणाताई सूर्यवंशी सपोनी, शरद घोडके पोउपनि, संदीप अन्येबोईनवाड पोउपनी ,पालसिंग ब्राह्मण पोऊपनि ,बाबू जाधव यांचे सह पोलीस होमगार्ड कर्मचारी लक्ष देऊन असून व्यवस्थापन समितीचे मुतवली मुजावर बाबर ,अहमद फकीर, मोहम्मद सज्जादानशीन साजिद उल्लाह जागीरदार तसेच आर्णी येथील अकबर भाई ,वसंत कपाटे, विजय आमले ,अब्दुल जब्बार भाई, इलियास बावाणी, मनोज कीर्तने, सय्यद झहीर भाई यांचे सह शहर परिसरातील मान्यवर मंडळी सहकार्य करीत आहे.


