किनवट जंगलात नेहमी लागणाऱ्या वनव्यावर उपाययोजना करा - सामाजिक कार्यकर्ते बबन वानखेडे

 


किनवट  : किनवट वनविभागातिल जंगलात वारंवार वनवा लागून जंगलातील वनसंपदा नष्ट होत असून. लागणाऱ्या वनव्यावर तात्काळ उपाययोजना करुन कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकारी / कर्मचाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात यावी असे निवेदन सामाजिक कार्यकर्ते तथा पर्यावरण प्रेमी बबन वानखेडे यांनी सहाय्यक वनसंरक्षक किनवट यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.



दि. 23 फेब्रुवारी रोजी सिंदगी मो. व सिरमेटी परीसरातील जंगलात भीषण आग लागली, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वनसंपदा, जैवविविधता आणि पर्यावरणाचे नुकसान झाले आहे. मागील काही काळापासुन या भागात वारंवार वनवा लागण्याच्या घटना घडत असूनही वनविभागाने अद्याप कोणत्याही प्रभावी उपाययोजना केल्या नाहीत.



जंगलात लागणाऱ्या वनव्यात अनेक वृक्ष, औषधी वनस्पती तसेच जंगलातील प्राणी आणि पक्ष्यांचे मोठे नुकसान होत आहे. वनविभागाच्या दुर्लक्षामुळे आणि वेळेवर प्रतिबंधात्मक उपाय न केल्यामुळे या आगीच्या घटनामध्ये वाढ होत आहे. त्यामुळे यावर तातडीने लक्ष देऊन वनवा लागून वनसंपदा नष्ट होणार नाही यासाठी  उपययोजना करणे अत्यंत गरजेचे असून पुढील मागण्यावर गांभीयाने विचार व्हावा. असे निवेदनात नमूद केले आहे.

1) किनवट वनविभागातिल जंगलात वारंवार लागणाऱ्या वनव्याची सखोल चौकशी करुन दोषीवर कठोर कारवाई करण्यात यावी.

2) भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी योग्य ती प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि सतर्कता यंत्रणा विकसित करावी. 

सदर मागण्याचा निवेदनात उल्लेख केला आहे.

 किनवट वनविभागातिल वनसंपदा वाचविण्यासाठी तातडीने पावले उचलून आवश्यक ती कठोर कारवाई करावी..



 अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. अन्यथा बबन वानखेडे यांनी सामाजिक कार्यकर्ते व पर्यावरणप्रेमीसंह मोठे जनआंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनात दिला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post