कौळाणे ( मालेगाव ) :- भारतीय राजकारणाला नवी वैचारिक दिशा देणारे , विविध सामाजिक , धार्मिक सुधारणा घडवून शिक्षणास प्राधान्य देणारे महाराजा सयाजीराव गायकवाड ( बडोदा ) यांचे जन्मस्थळ मालेगाव तालुक्यातील कौळाणे असून तेथे राजवाडा आहे मात्र हा राजवाडा दुर्लक्षित असून त्यात महाराजांच्या संदर्भाने कोणत्याही बाबीचे संवर्धन करण्यात असलेले नाही , राजवाड्याचे सौंदर्य लोप पावत आहे तेंव्हा सदर राजवाडा राष्ट्रीय स्मारक कसे होईल या अनुषंगाने शासनाने प्रयत्न करणे गरजेचे आहे असे मत प्रसिद्ध साहित्यिक जयसिंग वाघ यांनी व्यक्त केले.
कौळाणे तालुका मालेगाव येथील महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या जन्मगावी असलेल्या त्यांच्या राजवाड्यास भेट देऊन माहिती मिळविली असता तेथील व्यवस्थापकांनी या संदर्भात तसेच या राजघराण्या विषयी माहिती दिली . महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी या राजवाड्याची निर्मिती केली असून ते काही दिवस या राजवाड्यात मुकामी राहिलेले आहेत असेही व्यवस्थापक यांनी सांगितले .
महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी त्यांच्या संस्थानात ज्या अनेक सुधारणा केलेल्या आहेत त्या देशास आजही मार्गदर्शक आहेत , स्त्री पुरुष समानता प्रस्थापित करून त्यांनी नवा आदर्श निर्माण केला आहे , त्यांनी बाबासाहेब आंबेडकर यांना शिक्षणा करिता आर्थिक मदत केलेली आहे , महात्मा फुले यांचेशी त्यांचे घनिष्ट संबंध होते , स्वामी विवेकानंद यांच्यावर त्यांच्या विचारांचा प्रभाव होता . तेंव्हा या राजाचे महाराष्ट्राशी असलेले नाते व त्यांनी केलेले एकूण कार्य लक्षात घेता त्यांचे राष्ट्रीय स्मारक उभे राहणे काळाची गरज असल्याचे मत जयसिंग वाघ यांनी मांडून गावकऱ्यांनी या कामी पुढाकार घ्यावा असेही त्यांनी सांगितले .
या प्रसंगी ए. पी.आय. गौतम तायडे , वरिष्ठ अभियंता मयूर वाघ , मैत्रेय तायडे यांनीही संपूर्ण माहिती जाणून घेतली..