काल समता सैनिक दल प्रशिक्षण चा दुसरा दिवस होता क्रीडा संकुल धारणी येथे प्रशिक्षण घेण्यात येऊन समारोपीय कार्यक्रम बौद्ध विहार धारणी येथे घेण्यात आला.
आज जिल्हा अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा प्रा. डॉ. मुकेश सरदार सर अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. बुद्ध व बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार व समता सैनिक दल याविषयी त्यांनी माहिती दिली.
केंद्रीय शिक्षिका संगीताताई सरदार यांनी महिला शिबीर आयोजित करण्याविषयी, त्याचे महत्व समजावून दिले. अचलपूर सचिव निर्मलाताई नागले यांनी मार्गदर्शन केले. प्रसिद्ध गायक व जिल्हा उपाध्यक्ष सागर भिसे सर यांनी आपले विचार व्यक्त करून आपल्या सुरेख आवाजात गीत गायन करून सर्वांना मंत्रमुग्ध केले.
धारणी तालुका अध्यक्ष राजकुमार खंडारे यांनी समता सैनिक दल घरा घरात पोहचविण्याची गरज असून त्या दृष्टीने कार्य करण्यात येईल असे विचार व्यक्त केले.
मेजर हिवराळे सर यांनी व्यसनमुक्त समाज बनविणे यासाठी समता सैनिक दलाचे कार्य याबाबत मार्गदर्शन केले.
कु. स्नेहा जंगले व अक्षय मनवर यांनी या शिबिरात काय शिकविले याबाबत आपले मनोगत व्यक्त केले. व अशा शिबिराची नियमित गरज असल्याचे सांगितले.
दिनांक 13 ते 14 जानेवारी असे दोन दिवशीय समता सैनिक दल शिबीर घेण्यात आले. शिबिराचे उदघाटन मा. राज्य संघटक विजकुमार चोरपगार साहेब यांनी केले.
या दोन दिवशीय शिबिराकरिता धारणी तालुका व शहर कार्यकारिणी यांनी अथक परिश्रम घेतले. गजानन सुखदेवे उपाध्यक्ष, संजय धुळे कोषाध्यक्ष, सुभाष विरघट उपाध्यक्ष, समाधान ठोके सचिव, रामजी कांबळे, सुनील तायडे, अनिल तायडे, व संपूर्ण समता सैनिक दल यांनी हा कार्यक्रम यशस्वी केला.
समारोपीय कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन सावेरी रामटेके, प्रस्ताविक राजरत्न रामटेके व आभार राहुल खंडेरावं यांनी केले.