राजगडच्या शिरपेचात मानाचा तुरा! गावातील पहिल्या आदिवासी MBBS डॉक्टर होण्याचा मान डॉ. श्रृतिका डाळके यांना

 





  ‌किनवट : आपल्या जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर राजगड येथील शांताबाई डाळके यांची नात तथा श्री भीमराव डाळके यांची सुकन्या डॉ. श्रृतिका भीमराव डाळके हिने वैद्यकीय क्षेत्रातील अत्यंत मानाची समजली जाणारी एम बी बी एस ( MBBS ) पदवी संपादन केली आहे. राजगड गावातून एम बी बी एस होणारी ती पहिलीच डॉक्टर ठरली असून, तिच्या या ऐतिहासिक यशाने गावाच्या शिरपेच्या मानाचा तुरा ठरवला गेला आहे.  ‌

 ‌ हरित क्रांतीचे प्रणेते स्व.वंसतराव नाईक यांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यानिमित्त राजगड ग्रामस्थांच्या वतीने डॉक्टर श्रुतिका हिच्या या नेत्र दीपक यशाबद्दल भव्य जाहीर सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. किनवट माहूर चे लोकप्रिय आमदार भिमरावजी केलाम यांच्या शुभहस्ते डॉक्टर श्रृतिका हिचा जाहीर सत्कार करून तिचा गौरव करण्यात येणार आहे.  ‌

एका सामान्य कुटुंबातून पुढे येत डॉक्टर श्रुतिकाने मिळवलेले हे यश राजगड आणि परिसरातील इतर विद्यार्थ्यांसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरले आहे. तिच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत असून, तिचे वडील भीमराव डाळके व कुटुंबियांवर अभिनंदनचा वर्षाव होत आहे. ‌ पुढील उज्वल वैद्यकीय सेवेसाठी आणि भावी वाटचालीसाठी राजगड गावचे सरपंच लक्ष्मण पारधी, उपसरपंच अविनाश तरोड , डॉ .प्रल्हाद पारधी, माधव लोखंडे, डॉ. विजय आडे, यांच्यासह समस्त राजगड ग्रामस्थांनी डॉ .श्रृतिका हिला मनापासून हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post