सिंदखेड येथे जिओ टॉवरसाठी मागणी; पिंटू आशीर्वाद पाटील यांचा पाठपुरावा सुरू

 




 सिंदखेड परिसरातील बामणगुडा, वायफनी, मनीरामखेड, लोकरवाडी, वसराम नाईक तांडा, करंजी सेलू व डुंद्रा आदी गावांमध्ये मोबाईल नेटवर्कची सुविधा अत्यंत अपुरी आहे. त्यामुळे विद्यार्थी, युवक, शेतकरी तसेच ग्रामस्थांना दैनंदिन कामकाजासह आपत्कालीन परिस्थितीतही अडचणींचा सामना करावा लागत आहे.

सिंदखेड येथे प्राथमिक आरोग्य केंद्र व पोलीस स्टेशन असल्याने या परिसरात चांगली मोबाईल नेटवर्क सुविधा उपलब्ध होणे आवश्यक आहे. त्यामुळे सिंदखेड येथे जिओ मोबाईल टॉवर उभारण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

या मागणीसाठी ग्रामपंचायतींचे ठराव घेण्याची प्रक्रिया सुरू असून, हा प्रश्न तातडीने मार्गी लागावा यासाठी शिवसैनिक व सामाजिक कार्यकर्ते पिंटू आशीर्वाद पाटील वायफनीकर संबंधित विभाग व जिओ कंपनीकडे सातत्याने पाठपुरावा करणार आहेत.

या प्रश्नाची दखल घेत कॅबिनेट मंत्री तथा विधानपरिषद आमदार हेमंत भाऊ पाटील यांनीही पत्राद्वारे संबंधितांकडे लक्ष वेधले आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना भेडसावणारी ही दैनंदिन समस्या लक्षात घेऊन तातडीने उपाययोजना करून सिंदखेड येथे जिओ टॉवर उभारण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

टॉवर उभारल्यानंतर परिसरातील मोबाईल नेटवर्कची समस्या कमी होऊन ऑनलाइन व्यवहार, शिक्षण, शासकीय कामकाज तसेच आपत्कालीन संपर्क व्यवस्था अधिक सुरळीत होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.


Post a Comment

Previous Post Next Post