महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ प्रलंबित मागण्या बीज भांडवल अनुदान योजनेअंतर्गत लाभ मिळावा-परिघा वेल्फेअर फाऊंडेशन





 नाशिक प्रतिनिधी डॉ. शाम जाधव 

नाशिक : आज दिनांक ३०/३/ २०२६ रोजी महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित बीज भांडवल योजना वर्ष झाले तरी अजून योजनेचा लाभ मिळालेला नाही योजना फक्त कागदोपत्री पूर्तता करणेच का अंमलबजावणी कधी होणार असा थेट सवाल आज सामाजिक कार्यकर्त्या व परिघावेल फेर फाउंडेशनच्या अध्यक्ष मीनाक्षी शेगावकर यांनी आज महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित जिल्हा सहाय्यक लेखाधिकारी लोहकरे साहेब व प्रादेशिक व्यवस्थापक संतोष शिंदे यांना त्याबाबत निवेदन देऊन योजनेची योजनेच्या अंमलबजावणी बाबत निवेदन देण्यात आले. 



    सोबत वंचित बहुजन महिला आघाडीचे सदस्य ज्योती उबाळे ताई व सामाजिक कार्यकर्ता सुषमा वैशाली ह्या उपस्थित होत्या ह्या वेळेस अधिकाऱ्यांनी  जिल्हाधिकारी  जिल्हा कार्यालय येथून विलंब असल्याचे सांगण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post