नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांचा माहूर शहरासह अनेक तांड्यातील मिरवणुकीत पदाधिकारी कार्यकर्त्या सोबत सहभाग
श्रीक्षेत्र माहूर : संत श्री सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त माहूर शहरासह वाईबाजार आणि वानोळा परिसरातील प्रत्येक तांड्यात बंजारा समाज बांधवांनी विविध कार्यक्रमासह मिरवणुकीचे आयोजन केले होते या मिरवणुकीत स्वर्गीय माजी आमदार प्रदीपजी नाईक यांची आठवण काढत विविध सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करत ढोल ताशा सह मिरवणुकीत संत श्री सेवालाल महाराजांच्या तैलचित्राची मिरवणूक काढत जयंती उत्साहात साजरी केली अनेक ठिकाणी झालेल्या मिरवणुकीत माहूरचे नगराध्यक्ष फिरोज भाई दोसानी यांनीही असंख्य पदाधिकारी कार्यकर्त्या सोबत सहभाग घेतल्याने स्वर्गीय माजी आमदार प्रदीप नाईक यांचे परिवार आणि बंजारा समाजाशी त्यांनी नाळ जुळवुन ठेवलेलीअसल्याने बंजारा बांधवांनी त्यांचा हृदय सत्कार करत संत श्री सेवालाल महाराज जयंती साजरी करण्यात आली.
संत श्री सेवालाल महाराज जयंती माहूर तालुक्यातील प्रत्येक तांड्यासह गावात उत्सहात साजरी करण्यात आली माहूरचे नगराध्यक्ष फिरोज भाई दोसानी यांचे सह मान्यवरांनी माहूर शहर व तालुक्यातील, हडसनी, शेकापूर, लांजी, लखमापूर, हिवळणी, पापलवाडी गावात भेट देऊन मिरवणुकीत सहभाग नोंदविला.
यावेळी तालुका अध्यक्ष मेघराज जाधव, युवक तालुका अध्यक्ष मारोती रेकूलवार, शहर अध्यक्ष अमित येवतीकर सामाजिक कार्यकर्ते माजी सरपंच नामदेव पवार यांचे सह मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्तित होते.
स्वर्गीय माजी आमदार प्रदीप नाईक यांच्यावर जीवापाड प्रेम करणारे त्यांच्यासाठी जिवाचे रान करणारे पदाधिकारी प्रत्येक तांड्यात जाऊन मिरवणुकी सहभाग नोंदवत असल्याने भेट दिलेल्या सर्व तांडा वासीय बंजारा बांधवांनी त्यांचा हृदय सत्कार केला तसेच स्वर्गीय आमदार प्रदीप नाईक यांच्या परिवाराशी घट्ट नाळ जुळवून ठेवल्यामुळे बंजारा समाजातून स्वर्गीय आमदार प्रदीप नाईक यांच्या परिवाराविषयी आस्था व्यक्त करत यापुढेही बंजारा समाज बांधव स्वर्गीय माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या परिवारासोबत उभा राहणार असल्या च्या घोषणा देण्यात आल्या.
तसेच नगराध्यक्ष फिरोज भाई दोसानी यांचे सोबत आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यां सोबत सर्वच तांड्यात संत श्री सेवालाल महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी तालुक्यातील सर्वपक्षीय मान्यवराकडून ठीक ठिकाणी संत श्री सेवालाल महाराज जयंती साजरी करण्यात आली.



