जिल्हा प्रतिनिधी : पवन पाटणकर शिराळा
अमरावती, : येथील सांयन्सकोर मैदान येथे १४ फेब्रुवारी पासून सुरू झालेल्या कृषि विकास परिषद व प्रदर्शनीला,मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधव भेट देत आहेत. १४ ते १८फेब्रुवारी अशी ५ दिवस चालणारी कृषि प्रदर्शनीचा पहिलाच दिवस मुख्य सभामंडप, विविध कंपन्यांने लावलेल्या स्टाॅल ला भेट देण्यासाठी,अक्षरशः हजारो शेतकऱ्यांची,विद्यार्थ्यांची उत्सूकता व चेहर्यावर आनंद दिसून येत होता.कृषि मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते प्रदर्शनीला झालेली सुरुवात आणि पहिल्याच दिवशी एवढ्या मोठ्या प्रमाणात मिळालेला शेतकऱ्यांचा भरघोस प्रतिसाद पाहता.नेमण्यात आलेली प्रचार प्रसिद्धी समिती यांचे सुक्ष्म नियोजन यास कारणीभूत आहे. प्रभावीपणे प्रचार व प्रसिद्धी साठी आणि प्रत्यक्षे अंमलबजावणी होण्यासाठी समिती मार्फत,जिल्हा, तालुका,व गावस्तर अशा तिनं कडीमध्ये केलेले सुक्ष्म नियोजन या कामी आले आहे.
त्यात जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात व गावागावात माहिती पोहचण्यासाठी घडीपत्रीका भिंतीपत्रीका शेतकरी ग्रुप द्वारे तसेच शहरांच्या मध्यवर्ती ठिकाणी फ्लेक्स,प्रचार रथ, फिरविणे,ॲडिऒ,व्हिडिओ द्वारे तसेच शाळा,महाविद्यालया बरोबरच शिक्षण विभागांना प्रत्यक्ष निमंत्रण पत्रिका पोहोचविणे, वृतमानपत्राद्वारे व ग्रामस्तरावर आयोजित सभेद्वारे,प्रचार प्रसिद्धी केल्यामुळे गावागावात जनजागृती होण्यास मदत मिळाली.
याकामी जिल्हा अधिक्षक राहुल सातपुते, प्रकल्प संचालक अर्चना निस्ताने यांच्या मार्गदर्शनाखाली,समिती प्रमुख निलेश राठोड व टिम यानी केलेले नियोजनबद्ध नियोजन होय, निलेश राठोड यांनी हे सर्व यश वरीष्ठा बरोबरच समिती मध्ये काम करणारे सहकारी ,मंडळ कृषी अधिकारी संजय भालेराव, सहा,अधिक्षक चंदीवाले, कृषि पर्यवेक्षक भूषण देशमुख,कृषि सहाय्यक मारोती जाधव,पवन राठोड याना दिले आहे.


