जिल्हा प्रतिनिधी : पवन पाटणकर
अमरावती : येथील सांयन्सकोर मैदान येथे सुरु असलेल्या जिल्हास्तरीय कृषि विकास परिषद व प्रदर्शनीला,मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधव भेट देत आहेत.
हि प्रदर्शनी १४ ते १८फेब्रुवारी अशी ५ दिवस चालणार आहे,कृषि मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते प्रदर्शनीचे उद्घाटन झाले.
या उद्घाटन पर प्रदर्शनीला खा.डाॅ.अनिल बोंडे कृषिआयुक्त सुरज मांढरे,कृषि संचालक सुनिल बोरकर सहसंचालक प्रमोद लहाळे, जिल्हा अधिक्षक राहुल सातपुते,प्रकल्प संचालक अर्चना निस्ताने सह, इतर मान्यवर उपस्थित होते.
उद्घाटनप्रसंगी बोलताना कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी कृषि विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी सर्वसमावेशक अशा विविध योजना राबविण्यासाठी शासन कटीबद्ध आहे असे सांगितले.
प्रदर्शनीमध्ये २८८ स्टाॅल लावण्यात आले होते,विविध स्टाॅलला कृषिमंत्री माणिकराव कोकाटे व मान्यवरांनी प्रत्यक्ष भेट देऊन माहिती घेतली.
त्यात स्मार्ट प्रकल्पा अंतर्गत लाभ घेतलेल्या श्रमजीवी नागपुरी संत्रा वरूड,MLK शेतकरी उत्पादक कंपनी चांदुरबाजार,यांचे क्लिनींग, ग्रेडिंग, वॅक्सिंग,युनिट मधील वॅक्सि केलेल्या संत्रा फळांची माहिती घेतली व प्रकल्पा बाबत समाधान व्यक्त केले.
या विविध स्टाॅल अंतर्गत पहिल्याच दिवशी विक्री होवून ९ लाख २४ हजार रुपयांची उलाढाल झालेली आहे,असे कृषि विभागाने सांगितले.
या प्रदर्शनीमुळे खर्या अर्थांनी शेतकरी ते ग्राहक संकल्पना प्रत्यक्षात साकार होताना दिसत आहे.



