अकोला - जिल्हा ग्रंथालय संघाचे अधिवेशन जिल्हा ग्रंथालय संघ जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय अकोला येथे दिनांक १४ फेब्रुवारी रोजी संपन्न झाले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अकोला जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष श्यामराव वाहुरवाघ तर उद्घाटक म्हणून डॉ. दीपक मोरे तर प्रमुख अतिथी म्हणून अमरावती विभागीय ग्रंथालय संघाचे अध्यक्ष प्रभाकर घुगे, विभागीय ग्रंथालय संघाचे कार्यवाह डॉ.सिताराम नालेगावकर, ग्रंथालय सहसंचालक डाॅ.राजेश पाटील, रामेश्वर पाटील,बाबुजी देशमुख वाचनालयाचे सचिव अनुराग मिश्र ,राम मुळे, मनमोहन तापडिया, अकोला जिल्हा ग्रंथालय संघाचे कार्यवाह समाधान इंगळे इत्यादी उपस्थित होते. दुपारच्या सत्रात आपल्या पाल्यांना वाचनाची सवय लावावी यासाठी पालकांची भूमिका सत्रात डॉ. गजानन वाकोडे यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद घेण्यात आला यामध्ये पत्रकार गावंडे, अनुराग मिश्र, राजेश डांगटे, रामेश्वर पोहेकर,इ सहभाग घेतला ग्रंथालय सेवक पुरस्कार विजेत्या ज्योती धबाले आणि शिक्षणतज्ञ डॉ गजानन नारे,यांचा सत्कार करण्यात आला. उदघाटन सत्राचे सुत्रसंचालन मनोज देशमुख तरआभार सदाशिव चांदूरकर यांनी मानले.समारोप सत्राचे सुत्रसंचालन ॲड.भरत उघडे तर आभार प्रणव तालोट यांनी मानले.जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाचे राजेश कोलते, कैलास गवाळे, रवींद्र लिखार इ. ग्रंथालय संघाच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.


