श्रीकांत राऊत यवतमाळ
महागाव तालुक्यातील सेवानगर तांडा येथे बंजारा समाजाचे आराध्य दैवत अखंड बालब्रह्मचारी श्री संत सेवालाल महाराज जगभरामधिल बंजारा समाजाचे आराध्य दैवत आहे. नाईक कुळातील भीमा नाईक यांचे ते चिरंजीव त्यांचे वडील श्रीमंत होते. बंजारा समाजाची प्रगती करावी, अशी इच्छा सद्गुरू श्री सेवालाल महाराजांची झाली.
लहानपणापासूनच आई धरमणी मातेकडून त्यांनी वीरांच्या कथा ऐकल्या होत्या. संत सेवालाल महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली गावात घरोघरी रांगोळी काढून, पालखी व कळसाची रॅली काढण्यात आली. आणि सेवालाल महाराज मंदिरावर महाप्रसादाचा आयोजन करण्यात आला २८५ जयंती महोत्सव साजरी सेवानगर येथे करण्यात आली यावेळी उपस्थित सेवानगरचे पुजारी मुरलीधर राठोड ताड्यांचे नायक उत्तम नायक, अरुण नायक कारभारी रामचंद्र पवार, सरपंच प्रतिनिधी राहुल राठोड, ग्रामपंचायत सदस्य शरद राठोड, विष्णू जाधव माझी तंटामुक्ती अध्यक्ष दशरत राठोड, एमडी राठोड, दयानंद राठोड, अविनाश चव्हाण, दशरथ राठोड, शिवदास राठोड (तेली), अनिल राठोड, अतुल राठोड, पवन जाधव व बंजारा समाजात बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

